U.S CDC : ‘ओमायक्राॅन’मुळे अमेरिकेत १८ वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस देणे आवश्यक’

U.S CDC : ‘ओमायक्राॅन’मुळे अमेरिकेत १८ वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस देणे आवश्यक’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : १८ वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना बुस्टर डोस देणं आवश्यक आहे. कारण, हा बुस्टर डोस सध्या जगभरात अत्यंत वेगाने पसरत असणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा आणि संसर्गजन्य स्ट्रेनचा सामना करण्यास सक्षम असल्याचं दिसत आहे, असे यूएस सेंटर फाॅर डिसीस कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (U.S CDC) यांनी सोमवारी सांगितले.

कोरोना लसीच्या बुस्टर डोससंदर्भात अमेरिकेच्या आरोग्य नियमकांनी फायझर आणि माॅडर्ना लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी २ दोन महिन्यांनी आणि जाॅन्सन एण्ड जाॅन्सनच्या बुस्टर डोसची ६ महिन्यांनी वाढवला आहे. पण, यापूर्वी U.S CDC ने बुस्टर डोस देणे थांबलेले होते.

सोमवारी U.S CDC चे संचालक रिचेल वाॅलेन्स्की म्हणाले की, "सध्या एजन्सी सावध भूमिका घेत आहे. कारण, ओमायक्राॅनच्या उदयामुळे कोरोनाच्या लसीकरण आणि बुस्टर डोस यावर जास्त भर दिला जात आहे." सूत्रांचा हवाला देत वाॅशिंग्टन पोस्टने असं सांगितलं आहे की, "१६ आणि १७ वयोगटातील मुलांच्या बुस्टर डोससाठी Pfizer आणि BioNTeck या कंपन्यांकडून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाला अधिकृत माहिती देणं अपेक्षित आहे."

द् वाॅल जर्नलच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या अन्न् व औषध प्रशासनाकडून येत्या आठड्यातच १६-१७ वयोगटातील मुलांच्या बुस्टर डोससंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. पण, फायझर, बायोटेक आणि एफडीएने राॅयटर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना प्रतिसाद दिला नाही.

तूर्तास जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमायक्राॅम व्हेरियंटसंदर्भात सांगण्यात आलं आहे की, "ओमायक्राॅनमुळे संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. जर्मनी, हाॅंगकाॅंग, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा देशात हे सिद्ध झालेलं आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञ आणि इतर देशातील शास्त्रज्ञही ओमायक्राॅन या व्हेरियंटच्या संदर्भात कोरोना लसीचा किती परिणाम होतो, यावर संशोधन सुरू आहे, असं सीडीसीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news