UPI Payment Alert | UPI पेमेंट यूजर्ससाठी सरकारचा मोठा इशारा, ‘अशी’ खाती ३१ डिसेंबरनंतर होणार बंद

UPI Payment Alert | UPI पेमेंट यूजर्ससाठी सरकारचा मोठा इशारा, ‘अशी’ खाती ३१ डिसेंबरनंतर होणार बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही देखील UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI यूजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, युजर्सच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे UPI खाते आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. तुम्‍ही तुमच्‍या PhonePe आणि Google Pay या अकाऊंटवर UPI आयडीने बराच काळ कोणताही व्यवहार केला नसेल. तर तो करा आणि तुमचे यूपीआय अकाऊंट सक्रिय करा. अन्यथा, तुमचा UPI आयडी ३१ डिसेंबर २०२३ नंतर बंद होईल, असा इशारा सरकारने UPI यूजर्सना दिला आहे. (UPI Payment Alert)

UPI Payment Alert : केवळ अकाऊंट बॅलेन्स चेक केला असेल तर खाते वाचणार

NPCI ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की, जर UPI युजर्सने त्याच्या UPI खात्यातून एक वर्ष कोणताही व्यवहार केला नाही, तर त्याचा UPI ID बंद केला जाईल. मात्र एखाद्या युजर्सने या एका वर्षाच्या कालावधीत त्याच्या जर आपला अकाऊंट बॅलेन्स चेक केला असेल तर ते त्यांच्या UPI आयडी ब्लॉक केला जाणार नाही. ते या नियमापासून वाचू शकतात, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. (UPI Payment Alert)

31 डिसेंबर 2023 पासून प्रक्रीया सुरू

NPCI ने पुढे म्हटले आहे की, 'डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात सुरक्षित व्यवहार अनुभव सुनिश्चित करण्यासाठी ग्राहकांनी बँकिंग प्रणालीमध्ये नियमितपणे त्यांच्या माहितीचे पुनरावलोकन आणि पडताळणी करणे आवश्यक आहे. यूजर्स त्यांचा खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलतात परंतु, त्या नंबरशी लिंक केलेले UPI खाते बंद करत नाहीत. UPI यूजर्संना सुरक्षित अनुभव प्रदान करणे हा या मार्गदर्शक तत्त्वाचा उद्देश आहे. या वर्षीही अनेक UPI खाती निष्क्रिय असतील. अशी खाती सिस्टीममधून काढून टाकली जातील. हे 31 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल. या संदर्भात प्रक्रियेपूर्वी NPCI यूजर्सना ई-मेलद्वारे अलर्ट पाठवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news