UP Crime news | कबाब चविष्ट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कूकची गोळ्या घालून हत्या

UP Crime news | कबाब चविष्ट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन कूकची गोळ्या घालून हत्या

बरेली (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; कबाब चविष्ट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly UP) येथे एका ५२ वर्षीय कबाब मेकरची (kebab maker) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) राहुल भाटी यांनी सांगितले की, बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. येथील प्रेम नगर भागातील प्रियदर्शनी नगरमधील एका जुन्या कबाबच्या दुकानात हा खुनाचा प्रकार घडला. (Cook shot dead in UP)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोघेजण एका लक्झरी कारमधून कबाब स्टॉलवर आले. यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. कबाबची चव चांगली नसल्याचे सांगत त्यांनी स्टॉल मालक अंकुर सबरवाल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी कबाब ऑर्डर केले होते आणि कबाबची चव चांगली नसल्याचा दावा करत त्यांनी १२० रुपये बिल देण्यास नकार दिला. यावरून स्टॉल मालक आणि दोघांच्यात जोरदार वादावादी झाली. हा वाद वाढत गेल्याने दोघांनी स्टॉल मालकाला मारहाण केली आणि कबाबचे पैसे न देता ते कारकडे गेले, असे एएसपी भाटी यांनी सांगितले. (UP Crime news)

जेव्हा अंकुर सबरवालने कबाब मेकर नसीर अहमद याला संबंधित ग्राहकांकडून १२० रुपये घेण्यासाठी पाठवले, तेव्हा त्यापैकी एकाने त्याच्यावर गोळी झाडली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर दोघेही तेथून पळून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Cook shot dead in UP)

कर्मचार्‍यांनी काढलेल्या फोटोंच्या आधारे ही कार उत्तराखंडमधील काशीपूर येथे असल्याचे आढळून आले आहे. "कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे," असे एएसपी भाटी यांनी सांगितले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news