वॉशिंग्टनमधील संवेदनशील क्षेत्रात अज्ञात विमानाची घुसखाेरी, पाठलागानंतर जंगलात कोसळले

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील संवेदनशील क्षेत्रात रविवारी अज्ञात विमान उडताना दिसले. संवेदनशील क्षेत्र असल्याने अमेरिकन हवाई दलाच्या F-16 विमानांनीही उड्डाण केले. F-16 ने अज्ञात विमानाच्या पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस अज्ञात विमान वॉशिंग्टन डीसीजवळ व्हर्जिनियाच्या जंगलात कोसळले. आम्‍ही या विमानाला लक्ष्‍य केले नसल्‍याचा दावा अमेरिकन हवाई दलाने केला आहे.

अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने केला संपर्क साधण्याचा प्रयत्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संवेदनशील क्षेत्रात अज्ञात विमान दिसले. यासंदर्भात यूएस नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने एक निवेदन जारी केले आहे की, F-16 जेटने विमानाच्या पायलटचे लक्ष विचलित करण्यासाठी ज्वालाही सोडल्या, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्याचवेळी एका संवेदनशील भागात अज्ञात विमानाने अचानक उड्डाण केल्याने अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती भवनात अलर्ट जारी करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

विमानात चार प्रवासी

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, क्रॅश झालेले विमान सेसना 560 साइटेशन व्ही विमान होते. ते रविवारी दुपारी 3.20 वाजता व्हर्जिनियातील जॉर्ज वॉशिंग्टन नॅशनल फॉरेस्टमध्ये क्रॅश झाले. अपघाताच्या वेळी विमानात चार जण होते, त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. अपघातग्रस्त विमानाचा शोध घेण्यासाठी व्हर्जिनिया राज्य पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. विमानातील लोकांबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news