Masked आधार कार्ड म्हणजे काय? ते कसे डाऊनलोड कराल?

file photo
file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: Unique Identification Authority of India (UIDAI) ने सुरक्षेसाठी आधार कार्डची मास्क कॉपी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मास्क केलेले आधार कार्ड म्हणजे, या कार्डच्या क्रमांकातील फक्त शेवटचे ४ नंबर दिसतात आणि आधीची ८ नंबर हे मास्क केलेले असल्याने दिसू शकत नाहीत. यामुळे आधार कार्डला अधिक सुरक्षा प्राप्त होते. अशा प्रकारे कार्ड डाऊनलोड करताना सुरुवातीची आठ अंक "xxxx-xxxx" असे दिसतात.

हे आधारकार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे

१. myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जा
२. Masked Aaddhar कार्ड डाऊनलोडसाठी क्लिक करा.
३. आधार कार्डचा नंबर एंटर करा.
४. त्या सोबत captcha code दिसेल तो एंटर करा
६. त्यानंतर OTP साठी विचारणा होईल. एंटर केल्यानंतर तुमच्या मोबाईलनंबर वर ओटीपी आलेला असेल.
७. OTP एंटर करा.
८. त्यानंतर सर्व्हिसेस सेक्शनमध्ये जाऊन डाऊनलोड आधार कार्डवर क्लिक करा.
९. Review Your Demographic Data सेक्शनमध्ये जा.
१०. त्यानंतर Do you want masked Aaddhar Card असा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news