कोरोनाविरूद्ध चाचपणीसाठी मॉक ड्रिल सुरु! केंद्रीय आरोग्‍य मंत्र्यांनी केली दिल्‍लीतील रुग्‍णालयाची पाहणी

केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्‍लीतील राममनोहर लोहिया रुग्‍णालयास भेट दिली. येथे त्‍यांनी रुग्‍णालयातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेची पाहणी केली.
केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्‍लीतील राममनोहर लोहिया रुग्‍णालयास भेट दिली. येथे त्‍यांनी रुग्‍णालयातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेची पाहणी केली.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशात पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्‍येत वाढ दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्‍ये देशात ५ हजार ८८० नवे रुग्‍ण आढळले आहेत. देशात आता सक्रीय रुग्‍णांची संख्‍या ३५ हजार १९९ इतकी झाली आहे.  कोरोना वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे केंद्र सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये आले असून देशभरातील सर्व सरकारी रुग्‍णालयातील तयारीची पाहणी करण्‍यासाठी आज देशव्‍यापी मॉक ड्रिलला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय आरोग्‍य मंत्र्यांनी केली रग्‍‍‍णालयाची पाहणी

केंद्रीय आरोग्‍य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्‍लीतील राममनोहर लोहिया रुग्‍णालयास भेट दिली. येथे त्‍यांनी रुग्‍णालयातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेची पाहणी केल्‍याचे 'एएनआय'ने म्‍हटले आहे.

मागील आठवडाभरात देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल ९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची सज्जता तपासून पाहण्याकरिता दिनांक १० व ११ एप्रिल रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले होते.देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये मार्चच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून गती आली. 17 मार्च रोजी कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 571 होती आणि उपचारार्थी रुग्णांची संख्या 15 हजार 119 होती. यानंतर दररोज सरासरी 4 हजार 188 रुग्ण नव्याने दाखल होत आहेत आणि शुक्रवारी ही रुग्णसंख्या 29 हजार 318 वर पोहोचली आहे.

देशातील कोरोना संसर्गाचा सरासरी दर 3.0 टक्क्यांवर, तर 8 राज्यामधील 10 जिल्ह्यांत हा दर 10 टक्क्यांंवर आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एक आढावा बैठक घेतली होती. देशातील 23 राज्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. सध्या दर 1 लाख लोकसंख्येमागे 100 चाचण्या हे प्रमाण निश्चित केले असले, तरी संबंधित राज्यांमध्ये त्यापेक्षाही कमी चाचण्या होतात, याकडे लक्ष देताना त्यांनी लसीकरणाची मोहीम आणि चाचण्यांची संख्याही वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या लक्षणांची भर

कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असताना देशात कोरोनाच्या लक्षणांमध्येही काही नवी लक्षणे समाविष्ट झाली आहेत. विशेषतः लहान मुलांच्या डोळ्याला संसर्ग होण्याचे प्रमाण आढळून आले. लहान मुलांचे डोळे चिकटणे, हा त्यातीलच एक भाग आहे. हे लक्षण यापूर्वीच्या लाटेमध्ये आढळून आले नव्हते. गेल्या 6 महिन्यांनंतर कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढत असल्याचे इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफपेडियाट्रिक्सचे पदाधिकारी आणि बिजनोरच्या मंगला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार, बालरोगतज्ज्ञ डॉ. विपीन विशिष्ठ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news