Amritpal Singh: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई: ‘अमृतपाल’चा जवळचा साथीदार अटकेत; सूत्रांची माहिती | पुढारी

Amritpal Singh: पंजाब पोलिसांची मोठी कारवाई: 'अमृतपाल'चा जवळचा साथीदार अटकेत; सूत्रांची माहिती

पुढारी ऑनलाईन : ‘वारिस पंजाब दे’ चा प्रमुख, खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगचा जवळचा साथीदार पपलप्रीत सिंग याला पकडण्यात पंजाब पोलिसांना यश आले आहे. पंजाब पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या कारवाईत होशियारपूर येथून अमृतपालचा साथीदाराला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पपलप्रीतने त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यानंतर तो होशियारपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पंजाब पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्स टीमने केलेल्या कारवाईत पपलप्रीतला होशियारपूरमधून अटक करण्यात आली आहे. आता पंजाब पोलिस त्याची चौकशी करून, अमृतपालवरच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत. अमृतपालपर्यंत पोहोचण्यासाठी पपलप्रीत अतिशय महत्त्वाचा दुवा असल्याचे देखील पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

पपलप्रीत सिंगनेच अमृतपाल सिंगला पंजाबमधून पळून जाण्यास मदत केली होती. यानंतर अमृतपाल सिंग आणि पपलप्रीत सिंग यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. दरम्यान १ एप्रिलला समोर आलेल्या माहितीनुसार, अमृपताल सोबत सावली सारखा सोबत असणारा त्याचा अगदी जवळचा साथीदार पपलप्रीत सिंग हा वेगळा झाला होता. त्यानंतर २७ मार्चच्या दरम्यान अमृतपालसोबत पपलप्रीत  फगवाडाहून होशियारपूरला आला होता. त्यानंतर ते येथून बाहेर पडून दोन वेगळ्या वाटांना गेले. अमृतपाल सिंग अमृतसरला तर, पपलप्रीत फगवाड्याला पळाल्याची माहिती पंजाब पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दिली होती.

हेही वाचा:

Back to top button