इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; अनेक कनेक्शन उघड

इन्कम टॅक्सच्या छाप्यांमध्ये १८४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता; अनेक कनेक्शन उघड
Published on
Updated on

मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर 7 ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार आणि 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याची माहिती आयकर विभागाने शुक्रवारी दिली.

आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला मुंबई, पुणे, बारामती, जयपूर आणि गोवा येथील तब्बल 70 ठिकाणांवर छापे टाकले होते. त्या कारवाईत मिळालेली कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांवरून या दोन रिअल इस्टेट समूहांनी सुमारे 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती आयकर विभागाने एका पत्रकाद्वारे दिली.

छापे घालण्यात आलेल्या या दोन रिअल इस्टेट समूहांनी अनेक कंपन्यांच्या जाळ्यामार्फत केलेले व्यवहार संशयास्पद असल्याचे सकृतदर्शनी दिसते. बोगस समभागांचे लाभांश, संशयास्पद विनातारण कर्जे, विशिष्ट सेवांसाठी मिळालेल्या संदिग्ध अग्रिम रकमा, अस्तित्वात नसलेल्या प्रकरणांच्या तडजोडीचे संगनमताने केलेले व्यवहार अशा पद्धतींचा अवलंब या दोन समूहांनी केला, असे आयकर विभागाने पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागाने हे संशयास्पद व्यवहार झाले, असे आयकर विभागाने नमूद केल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार असून, अजित पवारापुढील अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

हे व्यवहार संशयास्पद

मुंबईतील एका मोक्याच्या ठिकाणी असलेली कार्यालयीन इमारत, दिल्लीतील उच्चभ्रू भागातील आलिशान सदनिका, गोव्यातील एक
रिसॉर्ट, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतजमिनीची खरेदी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक आदी व्यवहारांसाठी बेहिशेबी
निधीचा वापर करण्यात आला. या मालमत्तांचे मूल्य सुमारे 170 कोटी रुपये आहे, असे आयकर विभागाच्या पत्रकात नमूद आहे.या दोन्ही आस्थापना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आयकर विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात कोणाचेही नाव नमूद नसले तरी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कारवाईबाबत अजित पवार म्‍हणाले हाेते…

आयकर विभागाने माझ्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकल्याबद्दल कोणतीही तक्रार नाही; मात्र माझ्या बहिणींच्या निवासस्थानी शोधमोहीम राबवण्यात आल्याबाबत दु:ख होते, अशी प्रतिक्रिया त्यावेळी पवार यांनी दिली होती. मी अर्थमंत्री असल्याने वित्तीय शिस्तीचे पालन करतो. माझ्याशी संबंधित सर्व व्यवसायांचा करभरणा कटाक्षाने केला जातो, असेही ते म्‍हणाले हाेते.

मात्र, 35 ते 40 वर्षांपूर्वी विवाह झालेल्या माझ्या बहिणींच्या घरांवर छापे टाकण्यात आल्यामुळे मी उद्विग्न झालो आहे. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून ही कारवाई झाली असल्यास या संस्थांचा वापर कशाप्रकारे होत आहे, याचा लोकांनी जरूर विचार करावा.या कारवाईला राजकीय कोण आहे का, याबाबत आयकर विभागच अधिक सांगू शकेल, असे त्यांनी म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आयकर विभागाच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्‍वभूमीवर आयकर विभागाने पत्रकाद्वारे शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्ध  छाप्यांचा तपशील उघड केला.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news