उमरान मलिक : जम्मू काश्मीरच्या या गोलंदाजाच्या वेगाने सर्वांनाच लावले वेड !

उमरान मलिक : जम्मू काश्मीरच्या या गोलंदाजाच्या वेगाने सर्वांनाच लावले वेड !
Published on
Updated on

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात जम्मू काश्मीरच्या उमरान मलिक नावाच्या वेगावान गोलंदाजाने काल ( दि. ३ ) आयपीएल पदार्पण केले. हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या पहिल्याच सामन्यात वेगवान गोलंदाजी करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात संधी मिळालेल्या उमारन मलिकने सातत्याने १४० किमी प्रतितास वेगाच्या पुढेच गोलंदाजी करत फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. तो टाकत असलेला प्रत्येक चेंडू फलंदाज अत्यंत सावध पवित्र्यात खेळत होता. यामुळे क्रिकेट रसिक आणि वेगावान गोलंदाजीचे चाहते दोघेही उमरान मलिकची ही वेगवान गोलंदाजी पाहताना आनंदले होते. उमारन मलिक १४० किमी प्रतितास वेगाना गोंलंदाजी करत असतानाच त्याने एक चेंडू १५१ किमी प्रतितास वेगाने टाकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

खूश झालेल्या क्रिकेट चाहते आणि क्रिकेट जाणकारांनी १५१ किमी प्रतितास वेगाने टाकणारा उमरान मलिक लवकरच भारतीय संघात दिसेल अशी भविष्यवाणीही करुन टाकली. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या उमरान मलिकने आपल्या चार षटकात ६.८० च्या सरासरीने २७ धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. मात्र त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना कायम सतर्क राहण्यास भाग पाडले.

नेट बॉलर उमरान मलिक नटराजनच्या जागी आला संघात

उमरान मलिकने जानेवारी २०२० – २१ मध्ये खेळल्या गेलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीत जम्मू काश्मीरकडून टी २० पदार्पण केले होते. त्यानंतर उमरान मलिक हैदराबादच्या संघात नेट बॉलर म्हणून सिलेक्ट झाला. मात्र आपीएल सुरु होण्यापूर्वीच टी नटराजन कोरोनाग्रस्त झाल्यामुळे उमारन मलिकचे नशिब उघडले.

हैदराबादने टी नटराजानच्या जागी ऐत्यावेळीची रिप्लेसमेंट म्हणून आपल्या संघात समाविष्ट केले. त्यानंतर कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याला आपला जवला दाखवण्याची संधी मिळाली. त्यानेही जीव तोडून गोलंदाजी करत आपल्या वेगाने सर्वांचाचे लक्ष वेधून घेतले.

उमरान मलिक हा जम्मू काश्मीरचा चौथा खेळाडू आहे जो आयपीएलमध्ये आपली प्रतिभा दाखवत आहे. यापूर्वी उब्दुल समद, परवेज रसूल, रसिख सलाम हे देखील आयपीएल खेळले आहेत.

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news