ग्लेन मॅक्सवेल खाणार आयपीएलचं गाणार ऑस्ट्रेलियाचं!

ग्लेन मॅक्सवेल खाणार आयपीएलचं गाणार ऑस्ट्रेलियाचं!
Published on
Updated on

आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा ग्लेन मॅक्सवेल भलत्याच फॉर्ममध्ये आहे. आरसीबीने त्याला 14.25 कोटी देऊन आपल्या गोटात घेतले होते. ज्यावेळी आरसीबीने कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलसाठी इतकी मोठी किंमत मोजली होती त्यावेळी सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आयपीएलच्या 14 हंगामाच्या उत्तरार्धात त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी करत संघाला प्लॅ ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मात्र आयपीएलमध्ये मोठी रक्कम खिशात टाकणारा ग्लेन मॅक्सवेल सध्या त्याने निवडलेल्या जगातील पाच टॉप टी 20 खेळाडूंमुळे चर्चेत आला आहे.

मॅक्सवेलने आपण निवडलेल्या टॉप पाच टी 20 खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश केलेला नाही. आयसीसीने आगामी टी 20 वर्ल्डकपच्या अनुशंगाने माहोल तयार करण्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी काही व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले. त्यातील एक व्हिडिओ हा ग्लेन मॅक्सवेलचा आहे.

या व्हिडिओत ग्लेन मॅक्सवेलने तो आपल्या जागतिक टी 20 संघात आजी किंवा माजी कोणत्या पाच खेळाडूंचा समावेश करुन इच्छितो हे सांगितले. विशेष म्हणजे ज्या भारतात खेळून तो आपला खिसा भरतो. त्यात भारताचा एकही खेळाडू त्याने आपल्या पाच खेळाडूंमध्ये समाविष्ट केलेला नाही.

ग्लेन मॅक्सवेल : हे आहेत पाच फेव्हरेट टी 20 खेळाडू

या व्हिडिओत ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान याचा समावेश केला आहे. ग्लेन मॅक्सवेल राशिद खान बाबत म्हणतो, 'हा उत्कृष्ट फिरकीपटू आहे. त्याचबरोबर तो फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो.'

मॅक्सवेलने राशिद नंतर वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलचा पाच खेळाडूत समावेश केला आहे. 'रसेल हा वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. याचबरोबर चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याची ताकदही ठेवतो. तो अत्यंत शक्तीशाली अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे क्षेत्ररक्षणही कमालीचे आहे. रसेल असा खेळाडू आहे की जो कोणाच्याही टी 20 संघात असणारच.' मॅक्सवेलने रसेल बद्दल असे मत केले.

ग्लेन मॅक्सवेलने आपल्या पाच खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सचाही समावेश केला आहे. स्टोक्सबद्दल सांगताना मॅक्सवेल म्हणतो 'हा खेळाडू तुम्हाला अनेक प्रकारे मैदानात उपयोगी पडतो. फलंदाजीत तो काहीही करु शकतो. त्याच्याकडे फटक्यांचे वैविध्य आहे.'

ग्लेन मॅक्सवेल : पाचात दोन कांगारुंचा समावेश

ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या मॅक्सवेलच्या या यादीत ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. पहिला म्हणजे अॅडम गिलख्रिस्ट. मॅक्सवेल गिलख्रिस्टच्या समावेशावर म्हणतो की, 'हा माझ्या संघातील विकेट किपर असेल. त्याच बरोबर तो सलामीलाही खेळेल. मला गिलख्रिस्टचा खेळ पाहणे आवडते. तो तुम्हाला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकतो.'

गिलख्रिस्ट बरोबरच मॅक्सवेलने शॉन टेट याचाही समावेश आपल्या पाच खेळाडूंमध्ये केला आहे. याबद्दल तो म्हणतो, 'शॉन टेट याच्याविरुद्ध मी खेळलो आहे. तो किती वेगाने गोलंदाजी करतो ते मला माहीत आहे. तो त्याच्या कारकिर्दीच्या उतारत्या काळाताही भन्नाट वेगाने गोलंदाजी करत होता. मला वाटते की तो नक्कीच कोणत्याही फलंदाजाच्या मनात धडकी भवरू शकतो.'

टी 20 वर्ल्डकपची पात्रता फेरी ही 17 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या पात्रता फेरीची सुरुवात आयोजक देश ओमान आणि पापुआ न्यू ज्युनिया यांच्या सामन्याने होणार आहे. त्यानंतर टी 20 वर्ल्डकची सुपर 12 फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आपले अभियान सुरु करणार आहेत. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना हा 24 ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होणार आहे.

[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news