नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये (Russia – Ukrain War) भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याबद्दल रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह (Denis Alipov) यांनी दु:ख व्यक्त केले आहे. रशियाचे राजदूत अलीपोव्ह यांनी बुधवारी (दि. २) पत्रकार परिषदेत सांगितले की, 'भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल आम्हाला मनापासून दु:ख होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशिया शक्य ती सर्व पावले उचलेल.
ते पुढे म्हणाले की, रशिया (Russia – Ukrain War) नागरिकांवर हल्ले करत नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. आम्हाला दोष देणे सोपे आहे. हा रशियाला बदनाम करण्याचा प्रयत्न असू शकतो. म्ही भारताचे सामरिक मित्र आहोत. यूएनमध्ये संतुलित भूमिका दाखवल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताला या संकटाची खोलवर जाणीव आहे. रशिया – युक्रेन संघर्षाचा भारतासोबतच्या संरक्षण सौद्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीयांसाठी सुरक्षित कॉरिडॉरच्या प्रश्नावर ते म्हणाले, 'ते होईल, पण आत्ताच पूर्ण सांगता येणार नाही. रशियावरील निर्बंधांच्या प्रश्नावर अलीपोव्ह म्हणाले की, एस 400 करारावर कोणताही परिणाम होणार नाही. बाकीच्या व्यवसायावर काय परिणाम होईल इत्यादीचे आम्ही मूल्यांकन क. भारत रशियाचा महत्त्वाचा भागीदार आहे आणि राहील, असेही ते म्हणाले.
रशियन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात कर्नाटकातील हावेरी येथील नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला हाेता.
खार्किव मधील विद्यार्थी समन्वयक, ज्यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता तो फक्त जेवणाची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडला होता. युक्रेनमधील खार्किव येथे झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील एक विद्यार्थीही जखमी झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी ही माहिती दिली.