Ujjwala Yojana : उज्ज्वला योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या 12 गॅस सिलिंडरवरील सबसिडी एक वर्षासाठी वाढविली

ujjawala yojana
ujjawala yojana
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : उज्ज्वला योजनेअंतर्गत Ujjwala Yojana वर्षाला दिल्या जाणाऱ्या 12 गॅस सिलिंडरवरील सबसिडी एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. प्रत्येक सिलिंडरमागे सरकारकडून दोनशे रुपयांची सबसिडी दिली जाते. या निर्णयाचा फायदा देशभरातील 1.6 कोटी कुटुंबाना होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

उज्ज्वला योजनेअंतर्गत Ujjwala Yojana गॅसवर सबसिडी देण्याची योजना वर्ष 2022-23 मध्ये जाहीर करण्यात आली होती. सदर वर्षात गॅस सबसिडीपोटी सरकारला 6 हजार 100 कोटी रुपये खर्च करावे लागले होते. वर्ष 2023-24 साली या योजनेवर सरकारला 7 हजार 680 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news