udane ki asha
udane ki asha

उडने की आशा मालिका : सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी सचिन

Published on

उडने की आशा रंजक मालिका : 'स्टार प्लस' वाहिनीवरील नातेसंबंधांवर बेतलेल्या 'उडने की आशा' या नव्या मालिकेचा रंजक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन आणि नेहा हसोरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सायलीच्या भूमिकेतील अभिनेत्री नेहा हसोरा आणि सचिनची भूमिका निभावणारा कंवर ढिल्लन यांनी या 'प्रोमो'विषयी असलेली त्यांची उत्कंठा शेअर केली!

संबंधित बातम्या –

या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे सायली जबाबदाऱ्यांचे महत्त्व जाणणारी व्यक्ती आहे, तर दुसरीकडे सचिन बेफिकीर वृत्तीचा आहे. सचिन आणि सायली या अत्यंत दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र आयुष्य व्यतीत करण्याचा- लग्नाचा निर्णय कसा घेतात हेही या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळेल.

सायली म्हणाली, "मला या प्रोमोबाबत अत्यंत उत्सुकता आहे. अखेरीस हा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मी सायली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सायली ही एक मेहनती मुलगी आहे, जी तिच्या कुटुंबाला आधार देण्याकरता प्रत्येक काम, प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडते. तिचा संसार हा तिचा प्राधान्यक्रम आहे. सायलीला तिच्या पतीत काही गुण असावेत, असे वाटते. आयुष्याचा जोडीदार म्हणून तिला सचिन लाभला आहे. ज्याचे गुण, स्वभाव, प्रवृत्ती सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी आहे. सायलीची भूमिका परिपूर्णतेने वठविण्याकरता मी मराठी शब्दकोशाचा बारकाईने वापर केला. सायली फुलविक्रेती असल्याने फुलांचे हार कसे बनवायचे तेही मी शिकले. हा एक वेगळा अनुभव आहे आणि मी या मालिकेचा एक भाग असल्याबाबत मी कृतज्ञ आहे. ही भूमिका साकारण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते."

सचिन म्हणाला, "मी या मालिकेत सचिनची व्यक्तिरेखा साकारणार आहे; तो वेगळ्या वातावरणात वाढला आहे. त्याच्या आईने त्याला नाकारल्याने सचिनचे संगोपन त्याच्या आजीने केले आहे. सचिनला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. तो त्याच्या वडिलांच्या निकट आहे. सचिनचा लग्न आणि प्रेमावर विश्वास नसून तो बेफिकीर वृत्तीचा आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्याने मला मराठी भाषा शिकणे आणि मी जे पात्र साकारत आहे, ते पात्र अधिक अस्सलपणे वठवणे सोपे झाले. सचिनची भूमिका माझ्या नशिबात होती आणि ही भूमिका साकारण्यात व मालिकेचा भाग होण्यात मी खरोखरच स्वत:ला धन्य मानतो."

कंवर ढिल्लनने सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हसोराने सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे. 'उडने की आशा' यांची राहुल कुमार तिवारी निर्मिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news