Uddhav Thackeray Remark
Uddhav Thackeray Remark

Uddhav Thackeray Remark : देशात पुन्हा ‘गोध्राकांड’ शक्य! ठाकरेंच्या विधानावर ‘आप’ ची प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरेंची दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे वचनपूर्ती सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप पक्ष आणि नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान ठाकरेंच्या देशात 'पुन्हा गोध्राकांड शक्य' या विधानावरून देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आम आदमी पक्षाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray Remark)

आपचे मंत्री आणि प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे, उद्धव ठाकरे असे का म्हणाले, त्यांच्या माहितीचा स्रोत काय होता? हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे. पण ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांनी दीर्घकाळ भाजपसोबत सरकारही चालवले आहे. ते काही बोलत असतील तर ते गांभीर्याने घेतले पाहिजे, असे देखील आपने स्पष्ट केले आहे. Uddhav Thackeray Remark)

Uddhav Thackeray Remark: उद्धव ठाकरेंचे जळगावच्या सभेत काय होते विधान?

ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाची वचनपूर्ती सभा जळगावमध्ये रविवारी (दि.१०) पार पडली.  येत्या काही दिवसांत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला देशभरातून अनेक हिंदूंना बोलावले जाण्याची शक्यता आहे. समारंभ संपल्यानंतर लोक परत येत असताना ते गोध्रा घटनेसारखे काहीतरी करू शकतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्‍हटले होते.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news