मोदींचा धार्मिक प्रचार चालतो, मग आमच्या गीतातला धर्म शब्‍द का नाही? : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान आणि गृहमंत्री निवडणुकीत धार्मिक प्रचार करतायत या विषयी आम्‍ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर निवडणूक आयोगाने अमित शहा यांच्यावर काय कारवाई केली असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्‍थित केला. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार सभेतील व्हिडिओ दाखवत त्‍यांच्यावर हल्‍लाबोल केला. तसेच भाजप नेते देवाच्या नावाने मते मागतात ते चालते. मात्र निवडणूक आयोगाचा आमच्या प्रचार गीतावर आक्षेप का? म्‍हणत निवडणूक आयोगाने नियमावली बदलली आहे का? असा प्रश्न उपस्‍थित केला. आज मातोश्रीवर झालेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी भाजपवर जोरदार हल्‍ला केला.

आम्‍ही प्रचारासाठी एक गीत तयार केलं. त्‍या गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी या शब्‍दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत ते शब्‍द काढायला लावले. उद्या जय शिवाजी हा शब्‍दही काढायला लावाल. ज्‍या तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने शिवरायांनी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली, त्‍या भवानी मातेचे नाव घेण्याला आम्‍हाला कोणीही रोखू शकत नाही. आम्‍ही आमच्या गीतातून हे शब्‍द काढणार नाही. आयोगाला आमच्या महाराष्‍ट्राच्या कुलदैवतांविषयी इतका आकस का? तुम्‍हाला कारवाई करायची असेल तर पहिला पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर करा मग आमच्यावर कारवाई करा. आम्‍ही देवाच्या नावावर कधीच मते मागितली नाहीत. मात्र भाजप नेते देवाच्या नावावर मते मागत आहेत. रामाचं मोफत दर्शन देउन मतं मागण कितपत योग्‍य? असा सवालही त्‍यांनी यावेळी उपस्‍थित केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news