चीनमधून येणार्‍या प्रवाशांसाठी अमेरिका राबविणार नवीन कोरोना प्रतिबंधक उपाय

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमध्‍ये कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. याची गंभीर दखल अमेरिकेतील आरोग्‍य विभागानेही घेतली आहे. त्‍यामुळेच आता चीनमधून येणार्‍या प्रवाशांसाठी ( Travelers from China ) नवीन कोरोना प्रतिबंधक उपायांचा विचार अमेरिकेने सुरु केला आहे, असे रॉयटर्स वृत्तसंस्‍थेने म्‍हटलं आहे.

'रॉयटर्स'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, भारत, जपान, आणि मलेशिया या देशांमध्‍ये चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन कोरोना प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे. आता अमेरिकाही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम लागू करण्‍याच्‍या विचारात आहे. याबाबत पाऊल उचलण्यात सुरुवात केली आहे. चीनमधील वाढती रुग्‍णसंख्‍या चिंताजनक असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटलं आहे. ( Travelers from China )

चीनमधून येणार्‍या प्रवाशांसाठी  विमानतळावर कोरोना चाचणी सक्‍तीची करण्‍यात आली आहे, असे जपानने जाहीर केले होेत. यानंतर मलेशियानेही चीनमधून येणार्‍या प्रवाशांची चाचणी केली जाईल, असे स्‍पष्‍ट केले. भारतानेही चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून आंतरराष्ट्रीय आगमनासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे जाहीर केले आहे. तसेच या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्‍ह आल्‍यास संबंधितांना क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल, असेही स्‍पष्‍ट केले होते. आता अमेरिकाही चीनमधून येणार्‍या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी सक्‍तीसह अन्‍य प्रतिबंधक उपाययोजना करण्‍याच्‍या विचारात आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news