रविकांत तुपकर यांच्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

रविकांत तुपकर यांच्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

बुलडाणा;  पुढारी वृत्तसेवा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीने धडक दिलेल्या युवकाचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथील रूग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रविकांत तुपकर हे 22 नोव्हेंबरला रात्री 9 चे सुमारास इनोवा गाडीने मुंबईकडे निघाले होते. दरम्यान चिखली-देऊळगावराजा मार्गावर बेराळा चौकीवर त्यांच्या भरधाव इनोवा कारने एका दुचाकीला धडक दिली. रविकांत तुपकर यांच्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार तुषार गणेश परिहार (वय २६) व गजानन दिवानसिंह सोळंकी रा.येवता (ता.चिखली) हे दोन युवक गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या युवकांना औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रविकांत तुपकर यांच्या गाडीच्या धडकेने गंभीर जखमी झालेल्या तुषार परिहार या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news