पुणे : तोरणागडावर चढाई करताना दाेन दिवसांमध्‍ये 2 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

पुणे : तोरणागडावर चढाई करताना दाेन दिवसांमध्‍ये 2 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
Published on
Updated on

वेल्हे (जि.पुणे), पुढारी वृत्तसेवा :  वेल्हे तालुक्यातील  तोरणागडावर चढाई करताना सलग दोन दिवस दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर जखमी तरुणांना पाठीवरून गडाच्या खाली आणणाऱ्या पर्यटकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. तर दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांचे दर्शन झाले.

रविवारी  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वेल्हे मार्गे तोरणागडावर चढाई करताना ओंकार महेशकुमार भरमगुंडे (वय २१, सध्या रा. पुणे, मुळ रा. कराड) व शनिवारी दुपारी गडावर चढाई करताना पाऊलवाटेवर अत्यवस्थ होऊन निरंजन नितीन धुत (वय २२, रा. वारजे, पुणे) या महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बुरजावरील दगड डाेक्‍यात पडला

ओंकार भरमगुंडे हा आपल्या पाच मित्रांसोबत तोरणागडावर फिरण्यासाठी चालला होता. तोरणागडाच्या बिन्नी दरवाजाखालील रेलींगच्या पायऱ्याने गडावर चढाई करत असताना गडावरील तटबंदीच्या बुरजावर माकडांची भांडणे सुरू होती. त्यावेळी एक मोठा दगड बुरजावरुन कोसळून ओंकारच्या डोक्यावर पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. डोक्‍यातून मोठा रक्तस्त्राव सुरू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गडावरील सुरक्षारक्षक राजु बोराणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गडावर जाणारे कोल्हापूर येथील अभिजित पाटील यांनी प्रसंगावधानता दाखवत गडावर न जाता थांबले. अभिजित यांनी गंभीर जखमी ओंकार याला आपल्या पाठीवर घेतले. त्याला तातडीने उपचार मिळावे यासाठी अभिजित न थांबता वेगाने पाऊस वाटेने गडाच्या पायथ्याकडे धावत होते. तसेच त्यांचे सहकारी अक्षय ओंबळे, गुणवंत सावळजाकर आदी मित्र ओंकार याच्या मदतीला धावले.

 स्थानिक कार्यकर्ते, पोलीसांनी रुग्णवाहिका घेऊन गडाच्या पायथ्याला वाहनतळावर दाखल झाले. तेथून ओंकार याला वेल्हे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र कोणत्याही उपचाराला ओंकार याने प्रतिसाद दिला नाही. आणि त्याचा उपचारादरम्‍यान  मुत्यू झाला.

शनिवारी सकाळी वारजे येथील निरंजन धुत हा महाविद्यालयीन तरुण मित्रांसोबत तोरणागडावर फिरण्यासाठी आला होता. गडाच्या पायथ्याच्या वाहतळावर मोटारसायकल उभ्या करुन सर्वजण गडाच्या पाऊलवाटेने चालले होते. दुपारी पायी मार्गावरील उंबराच्या झाडाजवळ निरंजनला अस्वस्थ वाटू लागले. उलटी होऊन त्याला घाम आला. मित्रांनी त्याला पाणी पाजले. त्यानंतर त्याने मला बर वाटत आहे. मी गड पाहिला आहे. तुम्ही गडावर जा असे मित्रांना सांगितले. निरंजन हा गडावर न जाता पाउल मार्गावर थांबला.त्यानंतर दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध पडला. तेथून निरंजन याला उचलून मित्रांनी खाली आणले. वाहनतळावरील रुग्णवाहिकेतून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो उपचारापुर्वी मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news