पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter New CEO : एलॉन मस्क लवकरच ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहे. आता फक्त काही आठवडेच तो सीईओ राहणार आहे. कारण एलॉन यांना ट्विटरसाठी नवीन सीईओ मिळाली आहे. याबाबत स्वतः एलॉन मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विट करून नवीन सीईओ (Twitter New CEO) येत्या 6 आठवड्यात जॉइन करणार असे, म्हटले आहे. पण एलॉन यांनी तिचे नाव मात्र, गुलदस्त्यातच ठेवले आहे. एलॉन यांनी सीईओ म्हणून कोणाची निवड केली आहे, हे सांगितलेले नाही. मात्र, तिच्याकडे सीईओची जबाबदारी सोपवण्यासाठी एलॉन स्वतः खूप उत्सूक आहे, असे मस्क यांनी म्हटले आहे. तसेच तीने सीईओची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपण ट्विटरचे 'एक्झिक्युटिव्ह चेअर आणि सीटीओ' म्हणून काम पाहणार आहे, असे म्हटले आहे.
एलॉन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,"मी X/Twitter साठी एक नवीन CEO नियुक्त (Twitter New CEO) केला आहे हे जाहीर करण्यास मी खूप उत्सुक आहे. ती ~6 आठवड्यांत रुजू होईल! माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि CTO, उत्पादन, सॉफ्टवेअर आणि sysops देखरेख करण्यासाठी होईल."
एलॉन मस्क यांनी जरी ट्विटरच्या नवीन सीईओंबाबत (Twitter New CEO) घोषणा करताना नवीन सीईओचे नाव जाहीर केले नसले तरी ती एक महिला आहे हे सांगितले आहे. सध्या चर्चेत असलेल्या नावांपैकी लिंडा याकारिनो यांचे नाव पुढे येत आहेत. NBCUuniversal कार्यकारी लिंडा याकारिनो यांचे नाव ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (Twitter New CEO) बनण्यासाठी चर्चेत आहेत, अशी माहिती एनडीटीव्हीने वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने दिली आहे.
याकारिनो या NBCUuniversal Media मधील जागतिक जाहिरात आणि भागीदारीच्या अध्यक्ष आहेत. NBCUniversal च्या प्रतिनिधीने सांगितले की ती जाहिरातदारांना कंपनीच्या अपफ्रंट प्रेझेंटेशनसाठी रिहर्सलमध्ये होती.
मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर विकत घेतले आणि त्यानंतर लगेचच त्यांनी तत्कालीन CEO पराग अग्रवाल यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. 'ट्विटरचा ताबा घेताच त्यांनी माजी सीईओ अग्रवाल यांच्याबरोबरच, माजी मुख्य विधी अधिकारी विजया गड्डे आणि इतरांसह अनेक उच्च-स्तरीय अधिकाऱ्यांना देखील काढून टाकले.
याशिवाय ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्कने ट्विटरबाबत अनेक वेगवेगळे महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये ब्लू टिक व्हेरिफाईड सेवा पेड केली हा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय होता. तसेच खर्चकपातीसाठी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. याशिवाय काही काळासाठी ट्विटरचा शांत ब्लू बर्ड जाऊन त्या ऐवजी कुत्र्याचा लोगो देखील ठेवण्यात आला होता. मात्र, नंतर ट्विटर बर्डला पुन्हा आणले. डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते देखील पुनर्स्थापित करण्यात आले.
हे ही वाचा :