![एलन मस्क ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F12%2FElon-Musk.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील जगविख्यात उद्योगपती, टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांची नुकतीच ट्विटरच्या संचालक मंडळात नियुक्ती झाली आहे. त्यांनी ट्विटरचे ९.२% टक्के शेअर्स घेतलेआहेत. ते या मंडळात २०२४ पर्यंत असणार आहेत. (Twitter and Elon Musk ) ९.२ टक्के शेअर्स घेतले विकत
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (CEO) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत ही माहीती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आम्ही खुप उत्सुक आहोत, एलन मस्कला आम्ही ट्विटर संचालक मंडळात नियुक्त करत आहोत' या ट्विटला एलन मस्क ने रिप्लाय देत म्हंटले आहे की, येत्या काही महिन्यात ट्विटरमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी पराग आणि ट्विटरशी काम करण्यास उत्सुक आहे.
एलन मस्कने पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाउंटवर पोल घेत विचारलं आहे की, तुम्हाला ट्विटर एडिट बटण हवयं का? या पोलला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. याला ७३.६% ट्विटर युझर्सनी हाेय असा प्रतिसाद दिला आहे. तर २६.४% ट्विटर युझर्सनी नाही असा प्रतिसाद दिला आहे. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी एलन मस्कचे हे पोल ट्विट रिट्विट करत लिहले आहे की, या पोलचे परिणाम महत्त्वाचे असतील, 'कृपया काळजीपुर्वक मतदान करा.'
ट्विटरने ट्विट करत म्हंटले आहे की, आता सगळेच विचारत आहेत म्हणून सांगतो. 'होय, आम्ही गेल्या वर्षीपासून एडिट बटणाच्या पर्यायावर काम करत आहोत. मात्र, ही कल्पना आम्हांला ट्विटर पोलमधून आलेली नाही. आम्ही आता लवकरच यांची चाचणी सुरू करणार आहोत.'
Twitter Edit Button एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक आपल्या ट्विटरवर एक पोल सुरु केला होता. यामध्ये त्यांनी युझर्सना विचारले होते की, कार्यक्षम लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करते का? यावर तुमचा विश्वास आहे का? त्याच्या या पोलवर ७०.४ % युझर्सनी त्याचे उत्तर 'नाही' असे दिले होते. तर २९.६ % युझर्सनी 'हो' असे उत्तर दिले. या पोलच्या तत्पुर्वी त्यांनी हे ट्वीट करताना सांगितले होते की, या पोलचे महत्त्वपूर्ण असे परिणाम होणार आहेत. खूप विचारपूर्वक याचे उत्तर द्या. या पोलला (Twitter Poll) तब्बल १ लाख ७३ हजार लोकांनी लाईक केले आहे, ७५५० पोल ट्विट आणि त्रेचाळीस हजार लोकांनी रिट्विट केले आहे.
हेही वाचलंत का?