Twitter Breaking News : यू ट्यूब इन्स्टाप्रमाणे ट्विटरवर पैसे कमावण्याची संधी, लवकरच मॉनिटायजेशन सुरू होणार

Twitter Breaking News : यू ट्यूब इन्स्टाप्रमाणे ट्विटरवर पैसे कमावण्याची संधी, लवकरच मॉनिटायजेशन सुरू होणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter Breaking News : ट्विटर वर लवकरच मोठे ट्विट करता येणार आहे. त्यासाठी ट्विटमध्ये एक नवीन टेक्स्ट फीचर जोडण्यात येणार आहे. याशिवाय यू ट्यूब, इन्स्टाप्रमाणे लवकरच मॉनिटायजेशनच्या माध्यमातून लोकांना पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. एलन मस्कने याबाबत माहिती दिली आहे.

Twitter Breaking News : एलनने म्हटले आहे हे नवीन फीचर आल्यानंतर नोटपैडचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करायची गरज पडणार नाही. तसेच सर्व प्रकारच्या कंटेंटला ट्विटवर मॉनिटायजेशन केले जाणार. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सला पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. यावर एका वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मस्क म्हणाला कि ट्विटर यू ट्यूब पेक्षा जास्त पैसे देईन. यूट्यूब ला क्रिएटर्स जाहिरातींचे 55 टक्के रक्कम देतो. त्यामुळे ट्विटरवर निश्चितच यापेक्षा जास्त मिळणार आहे.

Twitter Breaking News : एडिट फिचर सर्वांसाठी असेल

एलन मस्कने हे ही म्हटले आहे की एडिट करण्याचे फिचर लकरच येणार आहे. ते देखिल सर्वांसाठी मोफत असेल. यापूर्वी असे म्हणण्यात येत होते ब्ल्यू सब्स्क्राइबर्सलाच फक्त हे मिळणार आहे. मात्र हे फिचर आता सर्वांना वापरता येणार आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news