Twitter : ‘चुकून काढले, परत या…’ नोकरीवरून काढलेल्या डझनभर कर्मचा-यांना ट्विटरने परत बोलावले | पुढारी

Twitter : 'चुकून काढले, परत या...' नोकरीवरून काढलेल्या डझनभर कर्मचा-यांना ट्विटरने परत बोलावले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter : एलन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी जवळपास निम्म्या कर्मचा-यांना कामावरून कमी केले होते. मात्र, त्यापैकी डझनभर कर्मचा-यांना चुकून कामावरून काढले असे म्हणत पुन्हा कामावर यायला सांगितले आहे. कंपनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पर्यत्न करत आहे. ब्लूमबर्ग न्यूजने रविवारी ही माहिती दिली.

Twitter : ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तावरून एनडीटीव्ही हिंदी ने याबाबत माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ब्लूमबर्ग न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की ज्यांना कामावर पुन्हा येण्यास सांगितले आहे त्यांना चुकून काढून टाकण्यात आले होते. त्यांना कामावरून काढल्यानंतर लक्षात आले की त्यांचे काम आणि अनुभव दोन्ही मस्क यांच्या दृष्टिकोनातून भविष्यासाठी मदत होऊ शकते.

ट्विटरचे सेफ्टी आणि इन्टेग्रिटी हेड योएल रोथ यांनी एका ट्विटमधून सांगितले होते की ट्विटर ने नुकतेच 50 टक्के कर्मचा-यांना काढले होते ज्यामध्ये ट्रस्ट आणि सेफ्टी टीमचे कर्मचारी देखिल सहभागी होते.

Twitter : सोशल मीडिया कंपनीच्या स्टाफद्वारे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, कम्युनिकेशन्स, कॉन्टेंट क्यूरेशन, मानवाधिकार आणि मशीन लर्निंग एथिक्स साठी जबाबदार टीमला काढून टाकण्यात आले आहे तसेच काही लोकांना प्रोडक्ट आणि इंजिनियरिंग टीममधून काढण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Twitter : ‘ऑफिसमध्ये येऊ नका’, ट्विटरचा कर्मचा-यांना मेल, खर्च कमी करण्यासाठी मस्कचा ‘डीप कट्स प्लान’, 50 टक्के कर्मचा-यांच्या नोकरीवर टांगती तलवार

Twitter Layoffs : मोठ्या नोकर कपातीबद्दल ट्विटरविरुद्ध खटला दाखल

 

Back to top button