तुला शिकवीन चांगलाच धडा : काय निवडेल अक्षरा, सत्य की सुख?

अक्षरा-अधिपती
अक्षरा-अधिपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीची लढाई एका वेगळ्या वळणावर पोहचली आहे. भुवनेश्वरीच सगळ्यात मोठं सत्य अक्षरा समोर आलं आहे. भुवनेश्वरी, अधिपतीची खरी आई नाही हे सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. अक्षरा सत्य सांगताना भुवनेश्वरीच्या अनेक गोष्टी अधिपती समोर आणते, हे सगळं अधिपती शांतपणे ऐकून घेतो. अक्षरा त्याला पटवून देते की कसं भुवनेश्वरी तुम्हाला अधोगतीकडे ढकलत आहे.

संबंधित बातम्या –

आईबद्दल इतकं ऐकल्यावर अधिपतीचा पारा चढतो आणि तो अक्षरावर हात उचलतो. पहिल्यांदाच अक्षरा आणि अधिपती मध्ये वाद इतक्या टोकेला पोहचतो. अक्षरा, अधिपतीचे वागणं पाहून अधिपतीला सोडून जाईल का? अधिपती समोर भुवनेश्वरीच सत्य समोर आणण्याचा ध्यास अक्षरा सोडून देईल का? काय निवडेल अक्षरा, सत्य की सुख? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणे रंजक ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news