जळगाव : जामनेर तालुक्यात ट्रक, रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

जळगाव : जामनेर तालुक्यात ट्रक, रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा

ट्रकने दिलेल्या धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर घटनेत ४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी जामनेर तालुक्याचे आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मदत केली आहे.

जामनेर ते गारखेडा दरम्यान हा अपघात झाला आहे. लाकडाने भरलेला एम.एच.- २१.६०४५ आयेशर व प्रवासी घेऊन जात असलेली पॅजो – रिक्षा एम. एच.- १९ ए.ई. ९१५८ यांच्यामध्ये ही धडक झाली. या धडकेत पॅजो रिक्षातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जी. एम. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या रुग्णालयात तसेच जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघाताची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सरू असून घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, जखमींची प्रकृती लवकर बरी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया आ. गिरीश महाजन यांनी दिली. दरम्यान यातील जखमी कु-हे पानाचे (ता. भुसावळ) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एसटी बस नसल्यामुळे प्रवाशांना पॅजो रिक्षातून प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास जीवघेणा ठरत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news