पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिपुरा विधानसभा निवडणुकी निर्णायक आघाडी घेतलेल्या भाजपने बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. ६० जागांपैकी भाजपने ५ जागांवर विजय मिळवला आहे तर २८ जागांवर आघाडी कायम आहे. आयपीएफटी एका जागेवर विजय मिळवला आहे.राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली टिप्रा मोथा पक्षाने ३ जागांवर विजय मिळवला असून ९ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी रोजी तब्बल ८६.१० टक्के मतदान झाले होते. राज्यात भाजप विरुद्ध माकप आणि काँग्रेस आघाडी असा सामना रंगला. तसेच नव्याने स्थापन झालेल्या टिप्रा मोथा पक्षानेही काही मतदारसंघांमध्ये प्रचार काळात आघाडी घेतल्याचे चित्र होते. आज सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीपासून भाजपने २८ मतदारसंघात निर्णायक आघाडी घेतली होती. दुपारी दीडनंतर राज्यात ६० जागांपैकी भाजपने ५ जागांवर विजय मिळवला आहे तर २८ जागांवर आघाडी कायम आहे. 'आयपीएफटी' एका जागेवर विजय मिळवला आहे.राजेशाही घराण्यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली टिप्रा मोथा पक्षाने ३ जागांवर विजय मिळवला असून, ९ जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, राजधानी आगरतळा येथील त्रिपुराचे मुख्यमंत्री मणिक साहा यांच्या निवासस्थानी मिठाईचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा :