अग्गं बाई अरेच्चा!!! तृणमूल म्हणते इलेक्ट्रोल बाँड लेटर बॉक्समध्ये मिळाले; देणाऱ्यांची नावे माहिती नाहीत

अग्गं बाई अरेच्चा!!! तृणमूल म्हणते इलेक्ट्रोल बाँड लेटर बॉक्समध्ये मिळाले; देणाऱ्यांची नावे माहिती नाहीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगला सादर केली आणि निवडणूक आयोगाने ही माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध केली. कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला कितीचा निधी दिला हेही आता उघड झाले आहे. इलेक्ट्रोल बाँडचा एक महत्त्वाचा लाभार्थी असलेला पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस. पण या पक्षाने इलेक्ट्रोल बाँडबद्दल खुलासा केला आहे. (Trinamool Congress Electoral Bond)

तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते कुणाल घोष म्हणाले, "आम्हाला जे इलेक्ट्रोल बाँड मिळाले आहेत, ते अज्ञातांनी आमच्या पक्ष कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये टाकले होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला किती पैसे मिळाले, याची पक्षाला काहीही माहिती नाही. इलेक्ट्रोल बाँडवर फक्त एक क्रमांक असतो. त्यावर कोणत्या कंपनीने इलेक्ट्रोल बाँड खरेदी केले होते, ते समजत नाही."

कुणाल घोष म्हणाले की, "निवडणुकांतील पैशाचा वापर थांबला पाहिजे, हीच तृणमूल काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १९९०पासून निवडणुकांचा प्रचार सरकारी खर्चाने झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. इलेक्ट्रोल बाँडचा कायदा भाजपने आणला. सर्व केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या ताब्यात आहेत, त्यामुळे कोणत्या कंपनीने आणि व्यक्तीने कोणत्या पक्षाला किती निधी दिला याची माहिती त्यांच्याकडेच आहे." (Trinamool Congress Electoral Bond)

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत इलेक्ट्रोल बाँडचे जे आघाडीची १० खरेदीदार आहेत, त्यांनी तृणमूल काँग्रेसला १,१९८ कोटी इतक्या रकमेचे बाँड दिले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news