क्लिनिकल डिप्रेशन; उपाय आणि उपचार पद्धती (भाग-३)

क्लिनिकल डिप्रेशन; उपाय आणि उपचार पद्धती (भाग-३)

आपण क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय भाग-१ आणि भाग-२ अशा दोन लेखांमध्ये आपण क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय, त्याची कारणं, परिणाम आणि त्याचं निदान कसं केलं जातं याबाबत सविस्तर बोललो आहोत. आता क्लिनिकल डिप्रेशनमधून रुग्णाला व्यवस्थितपणे बाहेर काढायचं असेल तर यावरील उपचार पद्धती समजून घेणं गरजेचं आहे. माईल्ड, माॅडरेट आणि सिविअर डिप्रेशनमध्ये विविध उपचार केले जातात. तिन्ही प्रकारात उपचार पद्धती वेगवेगळी आहे. चला तर क्लिनिकल डिप्रेशनवरील उपचार पद्धती सविस्तरपणे पाहू…

क्लिनिकल डिप्रेशनचे उपाय आणि उपचार

१) माईल्ड डिप्रेशन असेल तर फारशा औषधांची गरज नाही. समुपदेशन घेऊन मनात एक आशावाद निर्माण करणे, संबंधित व्यक्ती सकारात्मक विचार करू शकेल, असं समुपदेशन करणे. व्यसनांपासून (दारू, सिगारेट, गांजा) त्याला दूर करणे, दिवसांतून किमान अर्धा तास योगासने करणे आणि सर्वांत महत्वांचं म्हणजे आहाराकडे लक्ष देणे, उपायांती माईल्ड डिप्रेशनमधून व्यक्ती बाहेर निघू शकतो.

२) माॅडरेट डिप्रेशनमध्ये मात्र औषधांची गरज गरज असते. यामध्ये बऱ्याचदा व्यक्ती स्वतःचा इंटरनेटवरून सर्च करून वेगवेगळे उपाय करत असते. पण, त्याचा फारसा फरक जाणवत नाही. अशावेळी त्याचे व्यवस्थित उपचार घेणं आवश्यक आहे. त्यात टॅबलेट्स आणि इतर औषधं नियमितपणे घ्यावी लागतात. असे औषधोपचार व्यवस्थित घेऊन हळूहळू व्यक्तीला माॅडरेट डिप्रेशनमधून बाहेर काढणे. साधारणपणे यामध्ये संबंधित रुग्णाला ६ महिन्यांपर्यंत उपचार घ्यावे लागतात.

पण यामध्ये रुग्णाला असं वाटतं की, सुरुवातीची काही महिने औषधं घेतली की, त्यांना बरं वाटतं. नंतर ते औषधं घेणं बंद करतात. परिणामी, माॅडरेट डिप्रेशनसारखा मानसिक आजार पूर्णपणे बरा होत नाही. असं केल्यामुळे रुग्णाला पुन्हा डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे लागोपाठ न चुकता औषध घेणं गरजेचं असतं. या औषधांचा कालावधी व्यवस्थित पूर्ण केल्यामुळे मेंदूतील रसायनांचा असमतोलपणा निघून जातो.

३) सिविअर डिप्रेशनमध्ये औषधांची मदत घ्यावीच लागते. त्याचबरोबर रुग्णांच्या जीवनक्रमात बदल करावा लागतो. पण, त्या पलिकडे रुग्ण आपला जीवन संपविण्याकडे चालला असेल तर 'शाॅक थेरेपी'चा उपाय केला जातो. या उपचारामध्ये रुग्णाला आठवड्यातून ३ वेळा शाॅक देणे अर्थात ईसीटी (ECT) देऊन मेंदूतील रसायने कार्यान्वित केले जातात. आता शाॅक देण्यावरून समाजात भरपूर मिथ्य आहेत. पण, सिविअर डिप्रेशनमध्ये औषधांच्या तुलनेत शाॅक थेरेपी ही उत्तम असते.

उदा ः एखादी गरदोर महिला आहे. पण ती सिविअर डिप्रेशनमध्ये आहे. अशावेळी तिला औषधं देणं म्हणजे पोटातील बाळावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा शाॅक थेरेपी देणं महत्वाचं मानतं जातं. अशा तातडीने उपचार करण्यासाठी आणि औषधांचा परिणाम बाळावर होऊ नये यासाठी 'शाॅक थेरेपी' अर्थात ECT देणं आवश्यक असतं.

समाप्त

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news