जुन्या झालेल्या पडक्या घरात आढळला ‘इतक्या’ लाखांचा खजिना ; पाहुन थक्क व्हाल

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने असे मिळून सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल (खजिना) आढळून आला आहे.

जिल्ह्यातीस कासोदा गावातील ताराबाई गणपती समदानी यांचे कासोदा गावात असलेले जुने पडके घराचे खोदकाम चालु असतांना त्यात पुरातन शिक्के व सोन्याचे दागिने मिळाल्याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, कैलास गावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, किरणकुमार बकाले, यांनी योग्य सुचना व मार्गदर्शनानुसार किरणकुमार बकाले, पो. निरी. यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील सहा. पो. निरी. जालिंदर पळे, पोउनि अमोल देवढे, वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ. सुनिल पंडीत दामोदरे, पोहेक लक्ष्मण पाटील, पोनानंदलाल  पाटील, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाणे, पोका सचिन महाजन, चापोकों अशोक पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने कासोदा गावात जावून तपास केला.

आढळून आलेले चांदीचे शिक्के हे सन १९०५ ते १९१९ कालावधीतील असून सोन्याचे दागिने सुध्दा पुरातन काळातील असल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. सदर पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने हे एकूण १९,१७,२८३/- रुपये किमंतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदाराकडून तपासणी करुन खात्री करण्यात आली आहे. सदरचे पुरातन चांदीचे शिक्के व सोन्याचे दागिने पुरातन विभाग, नाशिक येथे हस्तांतर करण्यासाठी कासोदा पो.स्टे. ला जमा करण्यात आलेले आहेत.

ताराबाई गणपती समदानी यांचे कासोदा गावातील घराचे काम करणारे जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (३२) मुळ रा. बरही जि. गाजीपुर (उत्तर प्रदेश) हल्ली रा. कासोदा ता.एरंडोल, टॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (५०) रा. कासोदा ता.एरंडोल, टॅक्टर चालक संजय ऊर्फ सतिष साहेबराव पाटील  (३५) रा. कासोदा ता.एरंडोल, टॅक्टर चालक राहुल राजु भिल (२४) मुळ रा.बोरगाव ता.धरणगाव हल्ली रा.कासोदा ता.एरंडोल असल्याचे समजले. त्यांच्याशी पोलिस पथकाने संवाद साधला.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news