Transgender man | अहो आश्चर्यम! ट्रान्सजेंडर पुरूषाने दिला गोंडस मुलीला जन्म

Transgender man
Transgender man
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमधील एका ट्रान्सजेंडर पुरुषाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 27 वर्षीय कॅलेब बोल्डनने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जेव्हा बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यासाठी त्याने लिंग-संक्रमण करणारी औषधे घेणे बंद केले होते. त्यानंतर कॅलेब बोल्डनने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबतचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

कॅलेब आणि त्याचा जोडीदार नियाम्ह बोल्डेन यांना स्वत:चे मुल पाहिजे होते. त्यामुळे नियाम्ह याने स्पर्म डोनरच्या मदतीने मूल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण नियाम्हचा तीनवेळा गर्भपात झाला. त्यामुळे कॅलेब बोल्डनने स्वत: लिंग-संक्रमण करणारी औषधे घेणे बंद करत, बाळाला जन्म देण्याचे ठरवले. यानंतर त्याला लोकांच्या टीकेला देखील सामोरे जावे सागले. परंतु लोकांना न जुमानता कॅलेब याने वडील बनण्याची इच्छा दर्शवली.

समाजातील टीकेला न जुमानता 27 वर्षीय कॅलेब बोल्डनने आपल्या साथीदाराच्या खंबीर साथीने एका गोंडस मुलीला जन्मदेखील दिला आहे. यानंतर त्याने दुसऱ्या मुलाला जन्म देण्याची योजना आखणार असल्याचेदेखील कॅलेब याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news