पुण्यातील चांदणी चौकातील दररोज तीन तास वाहतूक बंद; ‘या’ तारखेपासून होणार बदल

पुण्यातील चांदणी चौकातील दररोज तीन तास वाहतूक बंद; ‘या’ तारखेपासून होणार बदल

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू होणार असल्याने पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक येथे दररोज रात्री साडेबारा ते साडेतीन या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात बंद राहणार आहे. 4 ते 15 जुलैपर्यंत हा बदल रहाणार आहे. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.

चांदणी चौक जंक्शनवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे 96 टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्प्यात आहे. एनडीए-पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्गावरील अवजड वाहतूक मध्यरात्री तीन तास थांबवण्यात येणार आहे.

मुंबईकडून येणारी जड वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथे व मुंबई-पुणे जुना महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे टोल नाका येथे थांबवली जातील. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून चारचाकी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे व चांदणी चौक विवा हॉटेल या मार्गाने कात्रजकडे जाणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे ब्रिज ते राधा चौक या दरम्यान येणारी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिजमार्गे जातील, असे उपायुक्त डोळे यांच्या आदेशात नमूद आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news