Tough Decision By BCCI : भारताच्या खराब कामिगिरीनंतर बीसीसीआयने केली निवडसमिती बरखास्त

Tough Decision By BCCI : भारताच्या खराब कामिगिरीनंतर बीसीसीआयने केली निवडसमिती बरखास्त
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलिया येथे खेळविण्यात आलेल्या टी २० विश्वचषकातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. उपांत्य सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर अपेक्षित बदलांची प्रक्रिया आता बीसीसीआयकडून दिसू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी याबाबत मोठा निर्णय जाहीर केला. यामध्ये त्यांनी पाच सदस्यांची राष्ट्रीय निवड समितीच बरखास्त केली आहे. त्यामुळे आता पुढे आणखी काही मोठे धक्के बीसीसीआय देणार का? याकडे सुद्धा क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. (Tough Decision By BCCI)

टी २० विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करत चांगली सुरुवात केली होती. संपूर्ण साखळी सामन्यात भारताने केवळ दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकारला होता. पण, इतर संघांच्या विरुद्ध भारतीय संघाने फारचे मोठे व निर्भेळ यश मिळवले नव्हते. अनेक वेळा अटीतटीच्या सामन्यात भारत विजयी ठरला होता. अगदी बांगलादेश विरुद्ध भारताच्या पाठिशी पाऊस धावून आला होता. अखेर उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून मोठ्या लाजिरवाण्यापद्धतीने पराभूत झाल्यानंतर अनेकांनी भारता सारख्या बलाढ्य संघाचे वाभाढे काढले. यानंतर भारतीय संघात अमूलाग्र बदलाची गरज असल्याची चर्चा सुरु झाली आणि आता त्याचे पडसाद दिसू लागले आहेत. (Tough Decision By BCCI)

शुक्रवारी बीसीसीआयने पहिला मोठा निर्णय घेत संपूर्ण पाच सदस्यीय राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली. बरखास्त केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष माजी कसोटीपटू चेतन शर्मा होते. तर इतर सदस्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील जोशी, देवाशिष मोहंती आणि हरविंदर सिंग यांचा समावेश होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच संघाच्या खराब कामगिरीचे पडसाद निवडकर्त्यांवर पडल्याचे दिसून आले आहे. हे जे खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, कठोर निर्णय घेत बोर्डाने नव्या निवड समितीसाठी अर्जही जारी केले आहेत. अशा कठोर निर्णयाची अपेक्षा केली जात होती. नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी निवडकर्त्यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. (Tough Decision By BCCI)

त्याच वेळी, बीसीसीआयने नवीन निवड समितीसाठी अर्जही जारी केले आहेत. राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य होण्यासाठी एकूण पाच पदे आहेत. ज्यामध्ये मध्य विभाग, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागासाठी आहेत. पदांसाठी पात्रता अटी खालीलप्रमाणे आहेत.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news