पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातील चालकाला अटक | पुढारी

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातील चालकाला अटक

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: नवी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयात काम करणाऱ्या चालकाला अटक केली आहे. या चालकावर गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली चालकाला जवाहरलाल नेहरू भवन येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चालकाचे नाव श्री कृष्णा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेतली. आरोपी चालकाला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते. पैशाच्या बदल्यात तो एका पाकिस्तानी व्यक्तीला माहिती आणि कागदपत्रे देत होता, असे सांगितले जात आहे. पाकिस्तानी व्यक्तीने चालकाला पूनम शर्मा किंवा पूजा नावाची महिला म्हणून खोटी ओळख करून दिली. त्याच्याकडून मुलींचा फोटो आणि व्हिडिओही जप्त करण्यात आला आहे.

या चालकाच्या अटकेनंतर आता पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयात काम करणारे आणखी लोक या प्रकरणात गुंतले आहेत का, याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान अनेकदा उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवतो. पण, यावेळी त्यांनी चालकाचा वापर केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button