One Nation, One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ समिती झाली सक्रिय, समिती अध्‍यक्षांना दिली प्राथमिक माहिती

One Nation, One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ समिती झाली सक्रिय, समिती अध्‍यक्षांना दिली प्राथमिक माहिती

नवी दिल्‍ली, पुढारी वृत्तसेवा : देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर स्थापन करण्यात आलेली समिती सक्रिय झाली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी या समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्राथमिक माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज (दि.३ सप्‍टेंबर) माजी राष्ट्रपतींची भेट घेतली. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी आणि त्यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे कोविंद हे अध्यक्ष आहेत.सरकारने आठ सदस्यीय समिती शनिवारी अधिसूचित केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा सचिव नितेन चंद्रा, विधिमंडळ सचिव रीता वशिष्ठ आणि इतरांनी रविवारी दुपारी कोविंद यांची भेट घेतली. त्यांनी समितीसमोर अजेंड्यावर कसे पुढे जाणार हे स्पष्ट केले. चंद्रा हे उच्चस्तरीय समितीचे सचिव देखील आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news