पुढारी ऑनलाईन : गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर आता खाली आले आहेत. काही आठवड्यांपूर्वी बाजारात तब्बल १८० ते २०० रुपये प्रतिकिलो किलो विकला जाणारा टोमॅटो आज चक्क १४ रूपये किलो दराने बाजारात मिळत आहे. ही बातमी ग्राहकांच्या दृष्टीने दिलासादायक असली तरी, टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पडल्याने टोमॅटो पिक शेतकऱ्याची मात्र मोठी निराशा (Tomato Prices) झाली आहे, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
नेपाळमधून टोमॅटोची आयात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमधील मागणीत घट झाल्यामुळे टोमॅटोच्या किंमतीत देखील लक्षणीय घट झाली आहे. घाऊक बाजारात किलोमागे 10 ते 5 रुपयांनी भाव कमी होऊ शकतो असेही अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत स्पष्ट झाले (Tomato Prices) आहे.
टोमॅटोटच्या किंमती घसरण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काही आठवड्यांपूर्वी १८० ते २०० रुपये किलोपर्यंत विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात पडल्याने, म्हैसूर एपीएमसीमध्ये टोमॅटोचे दर १४ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. जो शनिवारी २० रुपये होता. बंगळूरमध्ये टोमॅटोचा किरकोळ भाव रविवारी ३० ते ३५ रुपये प्रति किलो (Tomato Prices) होता.