Tom Latham : टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंडचे नेतृत्व

Tom Latham : टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंडचे नेतृत्व

ऑकलंड, वृत्तसंस्था : न्यू्झीलंडचा संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध, तर परदेशात पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 2021 नंतर तो पहिल्यांदाच टी-20 क्रिकेट खेळणार आहे. टीम साऊथी, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, डेव्होन कॉनवे, फिन लेन, मायकेल ब्रेसवेल व लॉकी फर्ग्युसन हे महत्त्वाचे खेळाडू आयपीएलमधील विविध संघांमध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांचा या मालिकांसाठी विचार करण्यात आलेला नाही. (Tom Latham)

याच कारणामुळे न्यूझीलंडच्या संघात आयपीएलमध्ये सहभागी होत नसलेल्या बहुतांशी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड – श्रीलंका यांच्यामध्ये सध्या एकदिवसीय मालिका सुरू असून दोन एप्रिलपासून दोन देशांमध्ये टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला टी-20 सामना 2 एप्रिल रोजी, दुसरा सामना पाच एप्रिल रोजी आणि अखेरचा सामना आठ एप्रिल रोजी होणार आहे. (Tom Latham)

श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार व यष्टिरक्षक), चाद बोवेस, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, बेन लिस्टर, डम मिल्न, डॅरेल मिचेल, जिमी निशाम, रचीन रवींद्र, टीम सेईफर्ट, हेन्री शिप्ली, इश सोधी, विल यंग.

पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार व यष्टिरक्षक), चाद बोवेस, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, बेन लिस्टर, डम मिल्न, डॅरेल मिचेल, जिमी निशाम, रचीन रवींद्र, टीम सेईफर्ट, हेन्री शिप्ली, इश सोधी, विल यंग, डेन क्लेव्हर, कोल मॅकोन्ची, ब्लेअर टिकनर.

हेही वाचा; 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news