मॉलमध्ये घसरगुंडीवरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

मॉलमध्ये घसरगुंडीवरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील घाटकोपरमधील मॉलमध्ये खेळताना घसरगुंडीवरून पडल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. नीलयोग मॉलमधील किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल गेल्याने ही दुर्घटना घडली. दालिषा करण वर्मा (वय 3) रा. टिळकनगर चेंबूरपूर्व असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

दालिषाचे आई-वडील तिला मॉलमध्ये घेवून गेले होते. यावेळी घसरगुंडीवर खेळताना तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. तिच्या डोक्याला मार लागल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news