Eknath Shinde: साहित्यिकांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजचे वातावरण पोषक : मुख्यमंत्री

Nagpur News
Nagpur News

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आज सारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही, असे सूचक वक्तव्य करून साहित्यिकांनी राजकारणावर लिहावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला शिंदे यांनी आज (दि.४) ऑनलाईन उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते. Eknath Shinde

राज्याच्या विकासावर बारीक लक्ष असल्याने डोळ्यांवर ताण पडला. व त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली, म्हणून उपस्थित राहू शकलो नाही, अशी कोपरखळी मारत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली. शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर भव्य दिव्य आयोजित केले जाईल. महाराष्ट्र शासन त्यासाठी परिपूर्ण सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. Eknath Shinde

खानदेश भूमी विशेषतः जळगाव व अंमळनेर वाल्मिकी ऋषी महर्षी, व्यास संत सखाराम महाराज अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. वाल्मिकी ऋषी यांचे नाव अयोध्येच्या विमानतळाला दिल्याने खानदेश व अयोध्या यांची एक नाळ जोडली गेली आहे. साने गुरुजी यांचा सहवास या भूमीला लाभलेला आहे.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथालयांना विशेष अनुदान देण्यात येणार आहे. जिल्हा महामंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंमळनेर येथे १०० वर्ष जुने तत्त्वज्ञान केंद्र आहे. या केंद्रासाठी सहकार्य कऱण्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news