Marathi Sahitya Sammelan | अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला डॉ. नीलम गोऱ्हे | पुढारी

Marathi Sahitya Sammelan | अमळनेर येथील मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला डॉ. नीलम गोऱ्हे

जळगाव : ऑनलाईन डेस्क न्यूज 
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ.गोऱ्हे ह्या स्वतः लेखिका असून त्यांनी सांगितले की, हस्तक्षेप आपण म्हटंल किती करुन घ्यायचा तरी प्रशासकीय चौकट कुठली स्विकारायची. हा कौशल्याचा भाग असतो. साहित्य हे सुध्दा समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे सुसंवाद, समन्वय मुदद्यांवर स्विकारायला हवं. मतभेद असेल तेथे वेगळ्या मार्गाने काम करणं हे स्विकारायला हवं. शेवटी जनता हुशार आहे. गावपातळीवर जसे तंटामुक्ती अभियान चालवलं जातं तस राजकीय पातळीवर देखील तंटामुक्तीसाठी करायला हवं असा विचार करायला हवा.

महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतलं. सानेगुरुजी कथामाला चालवली आहे. त्यांची पुस्तक वाचलेली आहे. स्मारक म्हणजे विचार मांडण्याचे प्रतिक असतं. त्यांचे विचार पोहचवणे म्हणजे आईबद्दलची माया, ममता, हळुवार भावना पोहचवणे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या पध्दतीने विचार पोहचे पाहिजे हे अगदी योग्य आहे. त्यामुळे स्मारकाला विरोध नाही.

मराठी शाळा काढणं अनिवार्य झालं आहे. इंग्रजी शाळांमुळे मराठी कमी करायची असे नाही. सरकारची भुमिका चांगली आहे. समाजमाध्यमामुळे मातृभाषेला जीवदान मिळाले आहे. एक मूल जेव्हा मराठी शाळा सोडून इंग्रजी शाळेत जातं तेव्हा मराठी शाळेची पटसंख्येवर परिणाम होतो. वाहिन्यांवरही मातृभाषेवर नवीन विषय मांडले जातात. त्यामुळे या गोष्टींना समाजाने प्रेमाने प्रतिसाद दिला तर मराठी भाषेला व्यापा-याची भाषा म्हणून ओळखले जाईल.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवरील मुद्दयांवर गो-हे यांनी विचार मांडले.

अभिरुप न्यायालय आणि अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ? यामध्ये त्या सरकारी मराठी भाषेसंदर्भात शासनाने राबविलेल्या योजना व उपक्रम व शासन करत असलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती देतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता खुले अधिवेशन व समारोपात सहभागी होऊन त्या विचार मांडणार आहेत.

Back to top button