ASEAN : नामिबियातून चित्ते आले आता भारतातील वाघ कंबोडियाला निघाले

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : ASEAN : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याचे पुन्हा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने भारताने नुकतेच नामिबियातून चित्ते मागवले. आता याच धर्तीवर कंबोडियातही वाघांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतातून वाघ कंबोडियात पाठवले जाणार आहे. शनिवारी या दोन्ही देशात या संबंधीचा करार करण्यात येऊन एमओयूवर हस्ताक्षर करण्यात आले. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

ASEAN : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिारी आशियान-भारत संम्मेलना दरम्यान हा दौरा केला. हे वर्ष ASEAN-भारत संबंधांना 30 वर्षे पूर्ण होत असून 2022 हे वर्ष ASEAN-भारत मैत्री वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. धनखड यांनी कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांची शनिवारी भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संस्कृती, वन्यजीव आणि स्वास्थ्यच्या क्षेत्रात चार करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. यामध्ये कंबोडियात वाघांचे पुनर्वसन करण्याची योजनेचा देखिल समावेश आहे.

ASEAN : या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये मानव संसाधन, लँडमाइन हटवणे आणि विकास प्रकल्पांसह इतर क्षेत्रात द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी धनखड यांन आसियान सम्मेलनाच्या सफल अध्यक्षतेसाठी कंबोडियाच्या पंतप्रधानांचे अभिनंदन देखिल केले आहे.

दोन्ही देशात झालेल्या चार करारांपैकी वाघांच्या पुनर्वसन योजनेवर उप राष्ट्रपति जगदीप धनखड यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, "भारतातून कंबोडियात वाघ आणण्यासाठी सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाल्याचे पाहून आनंद झाला. वाघांचे हे महत्त्वाकांक्षी ट्रान्स-कंट्री स्थलांतर आपल्या सुंदर ग्रहावरील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल.

ASEAN : याशिवाय स्वास्थ्य आणि औषध क्षेत्रातील सहयोग, जैव विविधता संरक्षण इत्यादी योजनांचा समावेश आहे. आईआईटी जोधपूर आणि कंबोडियाच्या इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यात अनुसंधान, विकास आणि सांस्कृतीत वारस्याच्या दस्तावेजच्या डिजिटलकरण तंत्रज्ञान क्षेत्रात करार झाले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news