नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तराखंड येथील चारधाम यात्रेचे मुख्य केदारनाथचे कपाट मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते विधिवत उघडण्यात आले असून, या यात्रेसाठी चौधरी यात्रा कंपनीतर्फे नाशिकहून रविवारी (दि.२३) पहिली तुकडी रवाना झाल्याची माहिती चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण चौधरी व रामगोपाल चौधरी यांनी दिली.
उत्तराखंडातील कठीण समजल्या जाणार्या बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री यात्रेसाठी तीन हजारांहून अधिक यात्रेकरूंनी सहभाग नोंदविला आहे. गेल्या वर्षाच्या तुलतेन या वर्षी यात्रेकरूंचा उत्साह वाढला असून, चारधाम यात्रेसाठी जाणार्यांची संख्याही वाढली आहे. २३ एप्रिल ते आॅक्टोबर २०२३ पर्यंत या यात्रा सुरू असणार आहे. यात्रेदरम्यान, सिमला-कुलू-मनाली, काश्मीर-वैष्णोदेवी, दार्जिलिंग-गंगटोक, महाराष्ट्र, गुजरात दर्शन, काशी-अलाहाबाद, दक्षिण भारत-रामेश्वर या सहलींना प्रवाशांचा प्रतिसाद अधिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :