![google](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2Fgoo.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई ; पुढारी ऑनलाईन मुंबईच्या गुगल ऑफिसमध्ये आज (सोमवार) एक धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. संशयीत आरोपीने फोन करून गुगलच्या पुणे ऑफिस मध्ये बाँम्ब लावल्याचे सांगितले. या फोनकॉल नंतर या ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. या फोनकॉलची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या विषयी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील गुगलच्या ऑफिसमध्ये फोन करून पुण्याच्या ऑफिसमध्ये बाँम्ब लावल्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी जलद हालचाली करत, या फोन कॉलची डिटेल्स काढल्या. पोलिसांनी या प्रकरणी हैदराबादेतून एका संशयीत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा :