OTT: आज पाहा तुम्हाला आवडणाऱ्या ‘या’ वेब सीरीज आणि चित्रपट

hum do hamare do
hum do hamare do

कोरोनाचा फटका सर्वाधिक चित्रपटगृहांना झाला होता. काही नियम शिथील करत चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली. त्यामुळे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. प्रत्येक शुक्रवारी बॉलीवूडचे चित्रपट ओटीटीवर (OTT) रिलीज होत आहेत. आता निर्माता दिग्दर्शक देखील ओटीटीवर एन्ट्री घेत आहेत. ओटीटीमुळे मोठ्या संख्येने लोक त्यांचे चित्रपट आणि वेब सीरीज पाहत आहेत. मोठ्या पडद्यापेक्षा ओटीटी (OTT) आता एक सहज सोपं प्रेक्षकांसाठी साधन बनलंय. प्रत्येक माणूस ओटीटीवर वेबसीरीज, चित्रपट पाहू शकतो. आज शुक्रवारी ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरीज रीलीज होत आहेत. पाहुया, हे कोणकोणते चित्रपट आणि वेब सीरीज आहेत?

हम दो हमारे दो

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि कृती सेनॉनचा चित्रपट 'हम दो और हमारे दो' आज ओटीटीवर रिलीज होत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही हे पाहू शकता. कॉमेडी रोमँटिक चित्रपटामध्ये राजकुमार राव-कृती सेनॉन शिवाय परेश रावल, रत्ना पाठक आणि अपारशक्ती खुरानादेखील दिसणार आहे. चित्रपटामध्ये कृती एक अशा मुलाशी लग्न करू इच्छिते. ज्याचे आई-वडील असावेत आणि एक कुत्राही असावा. राजकुमारला कृती खूप आवडते. म्हणून तो लग्न करण्यासाठी नकली आई-वडील घेऊन येतो. पुढील स्टोरी पाहण्यासाठी तुम्ही ही स्टोरी ओटीटीवर पाहू शकता.

aafat-e-ishq
aafat-e-ishq

आफत ए इश्क

जी5 वर आज आफत ए इश्क रिलीज होतेय. ही एक ब्लॅक कॉमेडी आहे. या वेब सीरिजमध्ये नेहा शर्माशिवाय दीपक डोबरियाल, अमित सियाल आणि नमित दासदेखील दिसत आहेत. या सीरीजमध्ये नेहा शर्मा ३० वर्षांची तरूणी लूलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मॅराडोना ब्लेस्ड ड्रीम

स्पोर्ट्स ड्रामावर आधारित 'मॅराडोना ब्लेस्ड ड्रीम' आज ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. ही बेव सीरीज स्पोट्स ड्रामा फुटबॉलचा लिजेंड प्लेयर डिएगो मॅराडोनाची बायोपिक आहे.

डिबुक

इमरान हाशमीच्या या चित्रपटाची प्रतीक्षा लोक करत आहेत. आज ॲमेझॉन प्राईमवर डीबुक पाहू शकता. इमरान हाशमीसोबत निकिता दत्तादेखील मुख्य भूमिकेत आहे. हॉरर थ्रिलर चित्रपट डिबुक- द कर्स इज रियलमध्ये हे दोघे दिसणार आहेत. हा एक मल्ल्याळम चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाच्या कहाणीमध्ये एक दुष्ट आत्मा अनेक शतकांनंतर जुन्या बॉक्समधून स्वतंत्र होते. आणि लोकांना त्रास देऊ लागते. थ्रिलने भरपूर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news