Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेत होणार आणखी वाढ

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेत होणार आणखी वाढ
Published on
Updated on

अयोध्या; पुढारी वृत्तसेवा : येथील राम मंदिराची सुरक्षा अधिक बळकट केली जाणार आहे. प्रवेशद्वारासह परिसरात चेहरेपट्टीत तरबेज असलेले तंत्रज्ञान वापरले जाईल. टेहळणीसाठी संपूर्ण मंदिरात 800 कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. अहोरात्र ते काम करतील. आकाशातूनही 24 तास ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येईल. मंदिराच्या सुरक्षेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चपखल वापरासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 1992 नंतर राम जन्मभूमी परिसरातील सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दल नव्या सुरक्षा व्यवस्थेनंतरही कायम राहील. (Ayodhya Ram Mandir)

कायम व्यवस्था (Ayodhya Ram Mandir)

  • 18 पीएसी कंपनी
  • 6 सीआरपीएफ कंपनी
  • 1 महिला आरपीएफ कंपनी
  • 1 सहायक जिल्हाधिकारी
  • 1 सहायक पोलिस अधीक्षक
  • 3 पोलिस उपअधीक्षक
  • 1700 पोलिस
  • 50 बॅरिकेडिंग

सुरक्षेची जबाबदारी पोलिस पार पाडतच आहेत; पण कट्टरवाद्यांकडून दिल्या जाणार्‍या सततच्या धमक्या पाहता ट्रस्टनेही मंदिरासह भाविकांसाठी उत्तम, अद्ययावत सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. ट्रस्टने स्वत:चा एक सुरक्षा सल्लागारही नियुक्त केला असून तो ट्रस्ट व पोलिस दलात समन्वयकाचे कामही करेल.
– डॉ. अनिल मिश्रा, विश्वस्त, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

मंदिर पूर्ण झाले की, गर्दी चार ते पाचपट वाढेल, हे गृहित धरून आम्ही त्या द़ृष्टीने आतापासून कामाला लागलेलो आहोत. स्वयंचलित शॉटगन, बुलेटप्रूफ जॅकेट, टेहळणी उपकरणे आणि शरयू नदीत तैनात करण्यात येणार्‍या चिलखती बोटी हे सारे खरेदी करण्याचे सध्या चाललेले आहे.
– आर. के. विश्वकर्मा, पोलिस महासंचालक, उत्तर प्रदेश

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news