अजित पवार यांच्या बैठकीतही कांदा प्रश्नावर तोडगा नाही ; आता मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा

अजित पवार यांच्या बैठकीतही कांदा प्रश्नावर तोडगा नाही ; आता मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा :

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी, बाजार समिती प्रतिनिधींची मुबंईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकाळी कोणताच तोडगा निघाला नाही. पण, या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत या संपावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

सायंकाळच्या या बैठकीत सर्वच नेते उपस्थितीत राहणार आहे. गेल्या बुधवारपासून कांदा व्यापा-यांनी संप पुकारला असून त्यामुळे कांदा लिलाव बंद असून कोटयवधींचे व्यवहार ठप्प झाले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला असून त्याचा आज सातवा दिवस आहे.

मुंबईच्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news