Thane News : मिरा-भाईंदरमध्ये साकारणार पहिले संगीत गुरुकुल | पुढारी

Thane News : मिरा-भाईंदरमध्ये साकारणार पहिले संगीत गुरुकुल

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा :  मिरा-भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील आरक्षण क्रमांक २४६ वर आ. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिले भारतरत्न स्व. लता मंगेशकर संगीत गुरुकुल (विद्यालय) साकारणार आहे. त्याचे भूमिपूजन येत्या २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मंगेशकर कुटूंबाच्या उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी लतायुग या लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारीत संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरात मोठ्या संख्येने कलाकार, कलाप्रेमी, संगीत प्रेमी वास्तव्य करीत असून त्यातच लता मंगेशकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात, यासाठी त्यांच्या नावे राज्यातील पहिले संगीत गुरुकुल उभारण्याची संकल्पना सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मान्यता |देत त्यांनी गुरुकुल साकारण्यासाठी २५ कोटींचा निधी मंजूर केला. 1. हे संगीत गुरुकूल पालिकेच्या मीरारोड येथील आरक्षण क्रमांक २४६ वर साकारण्यात येणार असून ते २ हजार ३९३ चौरस मीटर क्षेत्रात बांधले जाणार आहे. तळ अधिक १ मजली या संगीत गुरुकूलच्या इमारतीचे डिझाईन संगीत क्षेत्राला शोभेल व त्याची आठवण करून देईल, अशा पद्धतीने तयार करण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. त्याची निविदा प्रक्रिया पालिकेकडून पूर्ण करण्यात आली असून कामाचा कायदिश सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काय असणार या संगीत गुरुकुलमध्ये

या गुरुकूल मध्ये सर्व संगीत क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग राहणार असून त्यात बासरी, हार्मोनियम, तबला, शास्त्रीय | आदी संगीत क्षेत्रातील सर्व आवश्यक ते शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या संगीत गुरुकूलमध्ये म्युझिकल लायब्ररी, क्लासरूम, सराव व डबिंग रूमची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगीत विद्येचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम देखील या गुरुकूल मध्ये शिकविला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाशी है | संगीत गुरुकुल संलग्र करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील तत्वतः मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. २८ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांचा जन्म दिवस असून या दिवशी अनंत चतुर्थी असल्याने त्याच्या एक दिवस आधी संगीत गुरुकूलचे भूमिपूजन केले जाणार आहे.

भूमिपूजनावेळी मंगेशकर कुटूंब उपस्थित राहणार

ज्यांना संगीत व गायनामध्ये करियर करायचे आहे अशांना या संगीत गुरुकुलमध्ये संधी मिळणार आहे. भुमिपूजनानिमित्त | जीवनगाणी निर्मित लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांवर आधारीत लतायुग या संगीत कार्यक्रमाचे आयोजन दहिसर चेकनाका परिसरातील पालिकेच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहातच करण्यात येणार आहे. त्यात सर्वांना विनामूल्य | प्रवेश दिला जाणार असला तरी त्याच्या प्रवेशिका सरनाईक यांच्या मीरारोड येथील जन संपर्क कार्यालयातून मिळवाव्या लागणार आहेत. या संगीत गुरुकूलच्या भुमिपूजनावेळी ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर यांच्यासह मंगेशकर कुटूंब उपस्थित राहणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

Back to top button