निमोणे : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील निमोणे येथील एका शेतकरी महिलेला शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे या महिलेने शिरूरच्या तहसीलदारांकडे अर्ज करून 'माझ्या शेतात जायला रस्ता नाही, मला हेलिकॉप्टर घेण्यासाठी अनुदान द्या' अशी आर्जव केली आहे. या अर्जाची परिसरात मोठी चर्चा आहे. निमोणेनजीक भोसेवाडी-पिंपळाचीवाडी रस्त्याच्या आतल्या बाजूला लताबाई भास्कर हिंगे यांची शेतजमीन आहे.
या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी पूर्वी शेजारच्या शेतामधून रस्ता होता. मात्र, संबंधित शेतकर्याने ते शेत वहिवाटीखाली आणल्याने हा रस्ता बंद झाला. लताबाई हिंगे यांनी मागील सहा महिन्यांपूर्वी रस्त्यासाठी शिरूर तहसीलदार कार्यालयात अर्ज केला. अनेक वेळा त्यांनी मंडल अधिकारी व महसूल प्रशासनाची भेट घेऊन क्षेत्राची स्थळ पाहणी करून रस्त्याचा विषय मार्गी लावा म्हणून मागणी केली; मात्र प्रश्न मार्गी लागत नसल्याने त्यांनी थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
हेही वाचा :