Pune News : अजित पवार यांच्या बंदीवरून ‘माळेगाव’वर आज रणकंदनाची शक्यता

Pune News : अजित पवार यांच्या बंदीवरून ‘माळेगाव’वर आज रणकंदनाची शक्यता
Published on
Updated on

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा : कारखाना प्रशासन आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शनिवारी (दि.28) होणार्‍या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 67 व्या गाळप हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि.28) कारखाना कार्यस्थळावर मोळी टाकण्यासाठी येणार आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारखाना व पोलिस प्रशासन आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्यामध्ये शुक्रवारी (दि.27) बैठकीचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या :

या बैठकीमध्ये कारखाना प्रशासन उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले, तर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करू नये, त्याऐवजी मराठा क्रांती मोर्चाच्या महिलांच्या हस्ते गाळप हंगामाची सुरुवात करावी या आपल्या भूमिकेपासून मागे हटले नाहीत. अजित पवारांना कार्यक्रमास येण्यास मज्जाव करणार असल्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे सदर चर्चा फिस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार होणार्‍या माळेगाव कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाकडे परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news