जळगाव; पुढारी वृत्तसेवा : 210 वीजनिर्मिती केंद्रातील बकर येथील बेल्टवर पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सदरचा कामगार हा फेकरी येथे राहत होता. अशोक बाबुराव हटकर (वय 58) असे मृत कामगाराचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील 210 वीज निर्मिती केंद्रांमध्ये असलेल्या बकर मध्ये कन्वेयर बेल्टवर पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली. हटकर यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हटकर हे सफाई कामगार असून ते कन्वेयर बेल्टवर कसे गेले याची चौकशी केली जात आहे.
या ठिकाणी नाईट ड्युटीसाठी सुरक्षा व्यवस्था, अधिकारी अथवा सुरक्षा साधने आहेत की नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा
व्हिडिओ पहा : …आणि त्या दिवसानंतर शाहू महाराजांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला