“मला मोदींच्या काळात सिलेंडर मिळाला….” ; बोलता बोलता भाजी विक्रेत्याला कोसळलं रडू  

“मला मोदींच्या काळात सिलेंडर मिळाला….” ; बोलता बोलता भाजी विक्रेत्याला कोसळलं रडू  

पुढारी ऑनलाईन : सध्या एका भाजी विक्रेत्याचा व्हीडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. विशेष म्हणजे भाजपचे अमित मालविय यांनी या भाजीविक्रेत्याच्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. यामध्ये तो विक्रेता पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेतून आपल्याला गॅस सिलेंडर मिळाल्याचं सांगतो आहे. पण मालविय यांनी मात्र या पोस्टचा संबंध राहुल गांधींशी जोडत ट्वीट केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये मालविय म्हणतात, "उज्ज्वला योजनेंतर्गत रामेश्वरजींना मोदी सरकारकडून मोफत गॅस सिलिंडर मिळाले… पण या सगळ्यात केवळ राहुल गांधींनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेतला." हा एका मुलाखतीदरम्यानचा व्हीडियोही मालविय यांनी पोस्ट केला आहे.

या व्हीडियोमध्ये भाजी विक्रेते रामेश्वर यांना भाजीपाल्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे होणाऱ्या त्रासाबाबत बोलताना कॅमेऱ्यासमोर रडू कोसळल. राहुल गांधी यांनी सोमवारी आझादपूर मंडीला भेट दिली. त्यानंतर सोमवारी काँग्रेस खासदारांनी रामेश्वर यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्थाही केली. यानंतर राहुल यांनी रामेश्वर यांचं कौतुक करणारे ट्वीटही केले आहे.

रामेश्वर यांच्या गरीब परिस्थितबाबत राजकारण केल्याचा आरोप करत भाजपाने राहुल गांधी यांच्यावर आरोपाची राळ उडवली आहे. यादरम्यान बीबीसीने घेतलेली मुलाखतही समोर येते आहे. यात त्यांना विचारण्यात आले होते की राहुल गांधींनी त्यांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला आहे का? "नाही, ते (राहुल गांधी) असे कधीच करू शकत नाहीत. ते कोणाशीही असे करू शकत नाहीत," यानंतर  रामेश्वर यांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळाला का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रामेश्वर म्हणाले की त्यांना मोफत सिलिंडर मिळतो आणि त्यांची मुले सरकारी शाळेत मोफत शिकतात, पण भाडेकरू म्हणून त्यांना वीज आणि पाण्याचे बिल भरावे लागते. पंतप्रधान मोदींना भेटायला आवडेल का, या प्रश्नावर रामेश्वर म्हणाले की, मला कोणालाही भेटण्यात कोणतीही अडचण नाही. त्यानंतर त्यांना पुढे विचारण्यात आले की पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी काहीही केले नाही असे त्यांना वाटते का, रामेश्वर म्हणाले की, मी सर्वांसाठी काही सांगू शकत नाही. "कदाचित काही लोकांना फायदा झाला असेल. पण मला झाला नाही. मी काय सांगू?"

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news