Raavsaheb Teaser : देशाची सिस्टीम बिघडली…;जितेंद्र जोशीच्या ‘रावसाहेब’चा टीझर रिलीज

Raavsaheb Teaser
Raavsaheb Teaser

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) आगामी 'रावसाहेब' (Raavsaheb) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच धमाकेदार टीझर ( Raavsaheb Teaser ) रिलीज करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबधित बातम्या 

अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी 'रावसाहेब' (Raavsaheb) चित्रपटाचा धमाकेदार टीझर ( Raavsaheb Teaser ) रिलीज करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा अंधाऱ्या रात्रीत पोलिसाची एक टिम जंगलात दिसत आहे. यावेळी जितेंद्र जोशी, मुक्त बर्वे आणि मृण्मयी देशपांडे पोलिसांच्या भूमिकेत दिसतात. त्याच्यासोबतीला सोनाली कुलकर्णी आणि रश्मी अगडेकर दिसतात. दरम्यान जितेंद्र यांच्या कपाळावरील रक्त एका झाडांच्या पानावर पडताना दिसत आहे. यासोबत त्यांनी 'न्याय जंगलाच्या लोकासाठी आणि लोक आहेत जंगलासाठी, देश यातूनच मोठा होतो. देश आणि जंगलाची हीच… आहे. देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं राहतं…' असे म्हटलं आहे. या सगळ्यासोबत त्याच्या हातात मशालीही दिसत आहेत.

या टीझरच्या कॅप्शनमध्ये 'देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं…'रावसाहेब' लवकरच जवळच्या चित्रपटगृहात.' असे लिहिले आहे.याशिवाय टिझरच्या शेवटी ठळक इंग्रजी अक्षरात Raavsaheb असे लिहिलेलं दिसतंय. हा टीझर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कॉमेंट्स करत चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'रावसाहेब' या चित्रपटात मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे यांनी चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. दिग्दर्शक निखील महाजन आणि निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान खूप दिवसांनी पुन्हा जितेंद्र जोशी मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news